अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू आवाहन ,जिल्हाधिकारी काढणार फेर आदेश
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी १४ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्री यांनी जरी जाहीर केले असले तरी जिल्हाधिकारी काढणार फेर आदेश यामध्ये कोणत्या आस्थापना सुरु राहणार आणि कोणत्या बंद हे आदेशातच समजेल. जिल्हाधिकारी नेमकी कोणता आदेश काढणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पालक मंत्री हसन मुश्रीफ हे आज जिल्हा दौर्यावर आले होते यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना. प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, एसपी. मनोज पाटील, आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, आ. रोहित पवार उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी आज कोपरगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत महत्वपूर्ण सुचना केल्या. कोरोनाचा लढा सर्वांनी एकजुटीने यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. साईबाबा तपोभूमी येथे उभारलेल्या ५०० खाटांच्या कोविड सेंटरला भेट दिली. या दौऱ्यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Ahmednagar 14-day public curfew Hasan Mushrif