चक्क या कारणासाठी विद्यार्थिनीकडून प्राचार्याने मागितली १ लाख ४७ हजारांची लाच
अहमदनगर | Ahmednagar News: विद्यार्थिनीला बीएचएमएस पदवीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंटर्नशिप पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी वडाळा महादेव ता. श्रीरामपूर येथील होमियोपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्याने तब्बल १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राचार्याच्या सांगण्यावरून ही रक्कम कॉलेजमधील एका महिला लिपिकाने स्वीकारली तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघानाही रंगेहाथ पकडले असून त्यांना अटक करण्याची कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व लिपिक भारती बापूसाहेब इथापे असे या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार हे गंगापूर तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांची मुलगी वडळा महादेव येथील होमियोपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिच्या हजेरीची तडजोड करून तिला प्रमाणपत्र देण्यासाठी प्राचार्य बापूसाहेब यांनी लाच मागितली. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. गुरुवारी अधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये सापळा रचत पंचासमक्ष तक्रारदाराकडे १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. तसेच ही रक्कम कॉलेजमधील लिपिक इथापे हिने ती स्वीकारली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे व दीपक करांडे यांच्या पथकाने केली.
Web Title: Ahmadnagar news principal demanded a bribe of Rs 1 lakh 47 thousand from the student