Home अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या पहिल्या यादीत हे पंचरत्न

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या पहिल्या यादीत हे पंचरत्न

Ahilyanagar Vidhansabha Election BJP Candidate List: भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब.

Ahilyanagar Vidhansabha Election BJP Candidate List

Ahilyanagar News: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

शिर्डीमधून राधाकृष्ण विखे भाजपच्या पहिल्या यादीत भाजप नेते महसूल तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यांचा राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघ आहे. मंत्री विखे भाजपमधील प्रमुख नेते असल्याने त्यांच्यावर राज्यातील काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे मतदार संघात तळ ठोकून आहेत.

कर्जत-जामखेडमधून आमदार शिंदे भाजप नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना देखील पहिल्या यादीत स्थान मिळालं आहे. त्यांना कर्जत-जामखेडमधून उमेदवारी जाहीर झाली. 2019 मध्ये त्यांचा रोहित पवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख आहे.

शेवगाव-पाथर्डीमधून आमदार राजळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा संधी मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या त्या विश्वासू आहेत. पंकजा मुंडे पाथर्डीला आपली ‘मावशी’ मानतात. असं असलं तरी आमदार राजळे यांना पक्षांतंर्गत मोठा विरोध आहे. पक्षातील विरोधकांवर मात करत त्या पुन्हा विजयाला गवसणी कशी घालतात, याची उत्सुकता राहणार आहे.

राहुरी-नगरमधून शिवाजी कर्डिले नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना भाजपने राहुरी-नगर विधानसभा मतदार संघातून पुन्हा संधी मिळाली. 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवाजी कर्डिले यांना या पराभवाचा वचपा घ्यायचा आहे. यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे.

श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते ज्येष्ठ नेते भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. श्रीगोंदा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदारकीला समोरे जाणार आहे. बबनराव पाचपुते वयोमानानं थकल्यानं आणि आजारपणामुळं भाजपने त्यांच्याच पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली. पाचपुते यांचा या मतदार संघावर चांगली पकड आहे. प्रतिभा पाचपुते या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांना राजकीय अनुभव आता आमदारकी लढवताना उपयोग ठरेल.

आता विरोधकांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विरोधक कोणाला उमेदवार जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: Ahilyanagar Vidhansabha Election BJP Candidate List

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here