Home अहिल्यानगर अहिल्यानगर: धारदार शस्त्राने भोसकून विद्यार्थ्याचा मर्डर, भरलेल्या शाळेत रक्त सांडलं

अहिल्यानगर: धारदार शस्त्राने भोसकून विद्यार्थ्याचा मर्डर, भरलेल्या शाळेत रक्त सांडलं

Breaking News | Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या शाळेमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शाळेमध्येच विद्यार्थ्याच्या खून झाल्याची धक्कादायक घटना.

Ahilyanagar Student murdered by stabbing with sharp weapon

अहिल्यानगर : शाळा म्हणजे विद्येचं मंदीर, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मुलं शाळेमध्ये जातात, पण अनेक वेळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भांडणं आणि मारामाऱ्या होतात. ही भांडणं आणि मारामाऱ्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सोडवतात, पण अहिल्यानगरच्या शाळेमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शाळेमध्येच विद्यार्थ्याच्या खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

शहराच्या मध्यवर्थी भागात असलेल्या सिताराम सारडा विद्यालयात बुधवारी सकाळी ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आहे. बागडपट्टी, तोफखाना परिसरातील या शाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वाद झाला.

काही क्षणांमध्येच हा वाद इतका विकोपाला गेला आणि एकाने दुसऱ्यावर शस्त्राने हल्ला करून त्याचा जागीच खून केला. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि डीवायएसपी अमोल भारती यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील मयत आणि आरोपी दोघेही अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

भरलेल्या शाळेमध्ये मुलाची हत्या झाल्यामुळे शाळेतील सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच या घटनेनंतर शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शाळा परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. तसंच मुलाकडे शस्त्र कुठून आलं? याचा शोधही पोलीस घेत आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Breaking News: Ahilyanagar Student murdered by stabbing with sharp weapon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here