Home अहिल्यानगर अहिल्यानगर : खासगी क्लासमध्ये मुलीचा विनयभंग

अहिल्यानगर : खासगी क्लासमध्ये मुलीचा विनयभंग

Breaking News | Ahilyanagar: खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Ahilyanagar Girl molested in private class

अहिल्यानगर : शहरातील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास खासगी क्लासमध्ये घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला असून, आरोपी विकास भरत कोटकर (रा. शाहूनगर रोड, केडगाव) याला अटक करण्यात आली आहे.

पीडिता शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेते. आरोपी तिला जानेवारी २०२४ पासून त्रास देत होता. तू मला खूप आवडतेस, मी तुझी हरेशमेंट करणार नाही. मी काही टपोरी नाही, असे सांगून तो पीडितेशी जवळीक साधत असे. तसेच पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत होता. त्याने सोमवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास पीडिता क्लासमध्ये असताना तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ७४, ७५, ७८ यास बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Breaking News: Ahilyanagar Girl molested in private class

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here