Home अहमदनगर अहिल्यानगर: भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या चेअरमनला अटक

अहिल्यानगर: भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या चेअरमनला अटक

Ahilyanagar | Bhagyalakshami Multistate chairman Arrested:  350 ठेवीदारांच्या 21 कोटी रूपयांच्या ठेवी न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या पसार झालेल्या चेअरमनला एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेत अटक.

Ahilyanagar Bhagyalakshami Multistate chairman Arrested

अहिल्यानगर: सुमारे 350 ठेवीदारांच्या 21 कोटी रूपयांच्या ठेवी न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या पसार झालेल्या चेअरमनला एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. भारत बबन पुंड (वय 33, रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीदास सदाशिव जाधव (जेऊर ता. नगर) यांच्यासह ठेवीदारांची जेऊर शाखेत फसवणूक झाल्याने जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

4 ऑगस्ट 2022 ते 26 ऑगस्ट 2024 या काळात भारत बबन पुंड व त्याच्या साथीदारांनी जिल्ह्याभरातील विविध शाखेतील 350 पेक्षा जास्त ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांना रकमा दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. रोख रकमेच्या ठेवी घेऊन, डेली कलेक्शनव्दारे रकमा जमा करून घेतल्या. ठेवीदारांनी पैशाची मागणी केली असता भारत बबन पुंड इतर सहकार्‍यांनी यांनी 21 कोटी रूपयापेक्षा जास्त ठेवी परत फेड न करता आर्थिक फसवणूक केली. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट सोसायटीची जेऊर येथील शाखा बंद केली होती. गुन्हा दाखल झाल्यावर पुंड हा पसार झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असतांना सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना पुंड हा पंढरपूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जाधव, अंमलदार नितीन उगलमुगले, राजेंद्र सुद्रीक, किशोर जाधव, सुरज देशमुख, राहुल गुड्डू यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पंढरपूर येथून ताब्यात घेत अटक केली. पुंड याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांच्या ठेवी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अडकल्या आहेत. या गुन्ह्याचे मनीट्रेल व फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसे आदेश दिले आहेत. फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण झाल्यानंतर या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. कोणाच्या नावावर पैसे गेले आदी माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ahilyanagar Bhagyalakshami Multistate chairman Arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here