संगमनेरात पिस्तुलाचा धाक दाखवून सहा लाखांची शेती औषधे पळवली
Breaking News Sangamner: शेती औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग्स ट्रकमधून पळविण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यात पठार भागातील माहुली घाटामध्ये घडली.
संगमनेर: शेती औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग्स ट्रकमधून पळविण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यात पठार भागातील माहुली घाटामध्ये घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
ट्रकचालक दीपक कदम (रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचा शेती औषधांचा माल घेऊन फुरसुंगी, पुणे येथून लेलँड कंपनीचा ट्रक (एमएच ४२ ए क्यू ८०७८) हा नाशिककडे चालला होता. चाळकवाडीच्या पुढे रात्री दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात तरुण हात दाखवून गाडीमध्ये बसले. त्यांनी संगमनेरला जायचे असे सांगितले.
पहाटे चार वाजेच्या सुमारास माहुली घाटामध्ये एकाने लघुशंकेला जायचे असल्याचे सांगून गाडी थांबवत तो खाली उतरला. त्यानंतर गाडीत बसलेल्या दुसऱ्याने चालकाच्या कमरेला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने चालकाच्या नाकाला रूमाल लावून बेशुद्ध केले. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ट्रकचालक शुद्धीवर आल्यानंतर त्याला ट्रकमधील शेतीमालाचे औषध बॅग्स आणि बॉक्स असा सुमारे ५ लाख ७२ हजार २१४ रुपयांचे १८१ गायब झाल्याचे आढळून आले. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Agricultural medicines worth six lakhs were stolen from Sangamner gunpoint