रोहित पवारांच्या कार्यालयासमोर गारुड्यांचा खेळ करून आंदोलन
जामखेड: सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी मदारी समाजाच्या वतीने वसाहतीचे बांधकाम सुरु झाले नाही याच्या निषेधार्थ सकाळी साडे अकरा वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ सादर करत आंदोलन केले.
खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी ३ वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. निधीही प्राप्त झाला मात्र तरी देखील मदारी वसाहतीचे काम सुरु न करण्यात आल्याने आंदोलन करण्यात आले.
त्यांनतर तहसील समोर पाल ठोकून आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मदारी समाजातील खर्डा येथील बाजारतळावर ५० वर्षापासून अनेक गरीब मदारी समाज बांधव गोधडीचे पाल ठोकून राहत आहे. त्यांना व त्यांना मुला बाळांना अनेक वर्षापासून ऊन वारा पाउस यामधून जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. दोन वर्षापूर्वी या वसाहतीसाठी ८८ लाख निधी आला तरी सुद्धा काम सुरु झालेले नाही. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Agitations in front of Rohit Pawar’s office