Home पुणे मराठा आरक्षणासाठी मंगळवार पासून राज्यात होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही – मनोज...

मराठा आरक्षणासाठी मंगळवार पासून राज्यात होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही – मनोज जरांगे पाटील

Maratha reservation: रविवारी (ता.२२) आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार.

agitation for Maratha reservation in the state from Tuesday will not bother the government

मंचर:  मंगळवार (ता.२४) पासून होणारे आंदोलन सरकारला झेपणार व पेलणार नाही.” असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथे दिला.

“मराठ्यांच्या लेकरांनो गावागावात जाऊन मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा. जाळपोळ व उद्रेक करायचा नाही. शांततेने आंदोलन करा. हे युद्ध शांतता मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवून देणारे आहे. हे युद्ध जिंकायचेच आहे. रविवारी (ता.२२) आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व जिजाऊ माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.सुनिल बांगर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवगिरी मंगल कार्यालय ते मंचर बसस्थानक परिसरात जुन्या पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या पसरवून जरांगे यांचे जंगी स्वागत केले.

जरांगे पाटील म्हणाले “सध्या आपल्या लेकरांचे भवितव्य अंधारात आहे. त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. आरक्षणासाठी वाटेल ती किंमत मोजायची व वेदना सहन करायची तयारी आहे. पायाला हात लाऊन सांगतो अशी संधी आपल्याला परत नाही. आरक्षण देण्याबाबत मी चार दिवस मुदत दिली होती. पण सरकारने एक महिना वेळ माघून घेतली.

तोडगा काढायचा म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला. आपण त्यांना अजून दहा दिवस जास्त दिले. आत्ता ४० दिवस झाले आहेत. जर आत्ता पुन्हा आंदोलन सुरु झाले तर ते सरकारला पेलवणार नाही. कारण प्रश्न मराठ्यांच्या अस्तित्वाचा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या कल्याणासाठी हे आंदोलन आहे.  आत्महत्या न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.. मी उपोषणाला बसलो त्यावेळी सर्व मंत्रिमंडळ बसून होते. माझ्याकडून कधीही गद्दारी होणार नाही. मराठ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याची ताकद कोणतही नाही. आरक्षण मान्य होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”  एक मराठा,लाख मराठा’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी युवकांची उपस्थितीती मोठ्या संख्येने होती.

Web Title: agitation for Maratha reservation in the state from Tuesday will not bother the government

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here