Home अकोले अगस्ती कारखाना: मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे- विरोधी पक्ष नेते अजित...

अगस्ती कारखाना: मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे- विरोधी पक्ष नेते अजित पवार

Ajit Pawar: अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २९ वा गळीत हंगाम अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न.

Agasti karakhana I have come to thank you Ajit Pawar

अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखानाचा २९ वा गळीत  हंगाम आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किरण लहामटे होते.

अगस्ती ची निवडणूक नुकतीच पार पडली, ह्या निवडणुकीत तुम्ही माझे ऐकून महाविकास आघाडीचे शेतकरी समृध्द पॅनल विजयी केले, मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कारखाना अवस्था गेल्या २८ वर्षात नक्कीच आजारी केली आहे. कामगार भरती, कार्य क्षेत्रात उसाची नसलेली उपलब्धता, आवश्यक ते न केलेले तांत्रिक बदल , उसाचे उत्पादन वाढीचे उद्दिष्ट पूर्ण न करणे. चांगल्या प्रतीचे, दर्जेदार बियाणे तयार न करणे आदी बाबी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. एकट्या माजी चेअरमन कडे ३८ कर्मचारी काम करत होते, हा आमदार किरण लहामटे यांनी केलेले विधानाचा मुद्दा घेऊन त्यांनी चालक वगळता अन्य कर्मचारी स्वतःच्या घरात वापरू नका असा ही सल्ला दिला.

अगस्ती स्वयंपूर्ण होण्यासाठी काटकसर करावी लागेल. या करिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील अधिकारी मदत करतील. ८६०३२ सारख्या जादा उतारा देणाऱ्या जाती निवडाव्या लागतील असे सांगून, त्यांनी संचालक मंडळास मोलाचे मार्गदर्शन केले. मागील चुका करू नका, अन्यथा मलाच सांगावे लागेल हे संचालक मंडळ चांगले नाही. सीताराम गायकर साहेब यांचे नेतृत्व संयमी आहे. अनुभुवी आहे, त्यांच्या नेतृत्वाखालील निर्णय सक्षम असतील असे पवार म्हणाले. अगस्ती करिता जी जी मदत लागेल ती आम्ही करू.दिलेल्या कर्जाचा विनियोग योग्य करा, ऊस उत्पादन भरपूर घ्या. बाजारभाव देताना नफा तोटा पत्रक ही पाहत चला, साखर निर्यातीला प्रोत्साहन देणे सरकार चे काम आहे, तसा प्रयत्न शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करू असा ही आधार त्यांनी दिला.

कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर  यांनी आपल्या भाषणात सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. तसेच विरोधकांचा समाचार ही घेतला, दशरथ सावंत यांचा अनावृत पत्राची खिल्ली या वेळी अजित पवार व सीताराम गायकर यांनी उडवली. सोसायटी मतदार संघात मी का उमेदवारी घेतली, अन् सगळ्याच गटातून कसे जास्त मतदान मिळाले याचा मार्मिक विवेचन श्री गायकर यांनी केले. अशोक भांगरे यांनी प्रास्ताविक केले. तर मिनानाथ पांडे यांनी आभार मानले, व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक चंद्रशेखर घुले, प्रशांत गायकवाड , मधुकर नवले, अमित भांगरे, भानुदास मुरकुटे आदी उपस्थित होते. श्री अजित नवले, मधुकर नवले, भानुदास तिकांडे, प्रमोद मंडलिक, विठ्ठलराव चासकर, प्राध्यापक चौधरी , आदींची भाषणे झाली , सुमारे दहा हजार शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Agasti karakhana I have come to thank you Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here