संगमनेर: विवाहित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा
Breaking News | Sangamner: येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सासू आणि पतीवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मारहाणीच्या कलमांनुसार संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल.
संगमनेर: तालुक्यातील मिर्झापूर येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सासू आणि पतीवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मारहाणीच्या कलमांनुसार संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की सायली अविनाश वलवे हिचा मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्यासोबत विवाह झाला होता. त्यानंतर सासू सुभद्रा निवृत्ती वलवे आणि पती अविनाश वलवे हे आईवडिलांकडून ट्रॅक्टरची औजारे घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी सायली हिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते. तिने ही मागणी पूर्ण न केल्याने पती अविनाशने चापटीने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर सासू स्वयंपाक चांगला येत नाही, लोकांमध्ये चांगली वागत नाही असे हिणवायची. याबाबत सासू सतत तिच्या मुलाला सांगायची. मग पती अविनाश तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करायचा. अखेर याला वैतागून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विजय महिपत पवार (वय ४८, रा. मंगळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू सुभद्रा निवृत्ती वलवे व पती अविनाश निवृत्ती वलवे यांच्यावर भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ करत आहेत.
Web Title: against two in the case of suicide of a married girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study