Home अहमदनगर मंत्री विखे पाटलांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले….. मालकच

मंत्री विखे पाटलांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले….. मालकच

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा. (Manoj Jarange patil)

After the meeting with Minister Vikhe Patil, Manoj Jarange said

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला आहे. यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत काल मध्यरात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

मनोज जरांगे म्हणाले की, इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा आहे. मुलाखत होणार नाही. ज्यावेळी पाडायचं की लढायच हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आज फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी आजची चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर 20 तारखेला इथे 9 वाजल्यापासून 4 पर्यंत बैठक होईल. 20 तारखेला संयमात या. 20 तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.

विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, कशाच काय, चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचं, निर्णय घेता ही येत नाही. ज्या वेळी करायचं होतं तेव्हा केलं नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच (फडणवीस) भरकटला आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता मैदान वेगळं आहे, ते जिंकायचं की पाडायच ठरेल.

नारायणगडाची सभा झाल्यापासून इच्छुक उमेदवार वाढल्याचे वाटत आहे. एससी, एसटीचे उमेदवार देखील आमच्याकडे येत आहेत. 20 तारखेला जाहीर झाल्यानंतरही एससी एसटीचे उमेदवार दिसतील. जेव्हा ठरेल जो कोणत्याही पक्षाचा असेल तो आमच्या विचाराचा असेल तर मराठे त्याच्यामागे त्याच्या मागे उभे राहणार आहेत. ‘माझे ऐक नाहीतर खतम करू’ अशी जी रचना सूडबुद्धीची चालू आहे. त्यांचा शेवट राजकीय अंतात असेल, असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिला आहे.

Web Title: After the meeting with Minister Vikhe Patil, Manoj Jarange said

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here