Home अहमदनगर मंगल कार्यालयात विवाह संपन्न झाल्यानंतर चोरट्यांनी दागिने रक्कम केली लंपास

मंगल कार्यालयात विवाह संपन्न झाल्यानंतर चोरट्यांनी दागिने रक्कम केली लंपास

After the marriage was consummated, the theft jewelery

राहता | Theft: मंगल कार्यालयात विवाह पार पडल्यानंतर वधू -वर यांच्या सोबत फोटोसेशनच्या नादात वराच्या आई-वडिलांनी खुर्चीवर ठेवलेल्या बॅगेतील दागिने ,रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असे एकूण 1 लाख 30 हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास (theft) केलेली घटना घडली आहे.  मंगळवारी 7 डिसेंबर रोजी साकुरी येथील एका मंगल कार्यालयात ही घटना घडली. अ‍ॅड. चंद्रकांत बाबुराव टेके (राहणार कोपरगाव) यांनी याबाबत राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून  पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रकांत टेके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साकुरी येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी मुलगा आदित्य याचे लग्न होते. दुपारी 1 वाजे सुमारास  विवाह सोहळा संपन्न संपन्न झाला. यावेळी  आमच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक वधू -वर यांच्या जवळ स्टेजवर उभे होतो. फोटो काढण्यासाठी आमच्या जवळील असलेली बॅग पत्नी स्वाती हिने स्टेज जवळ असलेल्या खुर्चीवर ठेवली. फोटो काढल्यानंतर बॅग घेण्यासाठी पत्नी स्वाती गेली असता तिला खुर्चीवर ठेवलेली बॅग आढळून आली नाही. म्हणून आम्ही सर्वांना याबाबत विचारणा केली व शोध घेतला मात्र  बॅग मिळून आली नाही. मंगल कार्यालयातील असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक व्यक्ती सदरची बॅग घेऊन जाताना दिसला. तेव्हा आम्हाला खात्री झाली की आमची बॅग चोरीला गेली आहे. या बॅगमध्ये 85 हजार रोख रक्कम 25 हजारांचे दागिने 10 हजार किमतीचा मोबाईल 10 हजार किमतीचे घड्याळ अशी एकूण रक्कम 1 लाख 30 हजार रुपये लंपास केली असल्याची फिर्याद टेके यांनी राहाता पोलिसात दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल व्यवहारे हे करीत आहे.

Web Title: After the marriage was consummated, the theft jewelery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here