Home अहमदनगर सोसायटीच्या निवडणुकीनंतर दोन गटांत तुफान हाणामारी, तलवारीने हल्ला एक ठार, तिघे जखमी

सोसायटीच्या निवडणुकीनंतर दोन गटांत तुफान हाणामारी, तलवारीने हल्ला एक ठार, तिघे जखमी

After the election, two groups clashed, killing one with a sword

अहमदनगर | पाथर्डी | Pathardi : पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील सोसायटीच्या निवडणुकीनंतर (election) दोन गटांत तुफान मारामारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी तलवारीने हल्ला केल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनेने तालुक्यात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. 

पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शनिवारी मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला ११ जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर विजयी गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यासाठी जेसीबी आणला होता. जेसीबीतून गुलालाची उधळण सुरू होती. याचवेळी दोन गटात वाद झाला आणि तुफान मारामारी सुरू झाली. या राड्यात तलवारींनी चौघांवर वार करण्यात आले.

तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात अजय गोरख पालवे याचा मृत्यू झाला आहे,  तर विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अजय पालवे याला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला तर. इतर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Web Title: After the election, two groups clashed, killing one with a sword

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here