Home पुणे चुलतीच्या आत्महत्या नंतर पुतण्याचीही आत्महत्या  

चुलतीच्या आत्महत्या नंतर पुतण्याचीही आत्महत्या  

Breaking News | Shirur Suicide: एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पुतण्यानेही दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या.

After cousin's suicide, nephew's suicide too

पुणे  | शिरूर:  तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील संगमेश्वर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पुतण्यानेही दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गणेगाव दुमाला येथील संगमेश्वर वस्तीवरील कल्पना रविंद्र शिंदे (वय ३१) यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे (वय २४) यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

सचिन हा अविवाहित असून कुरकुंभ येथील सिपला कंपनीत कामाला होता. कल्पना यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले व पोलीस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.

Web Title: After cousin’s suicide, nephew’s suicide too

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here