Home अहमदनगर अहमदनगर: कॉपी पकडल्याने विद्यार्थिनीने प्रवरा नदीत मारली उडी

अहमदनगर: कॉपी पकडल्याने विद्यार्थिनीने प्रवरा नदीत मारली उडी

Ahmednagar News: नैराश्येतून विद्यार्थिनीने प्रवरा नदीपात्रात आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न, बेलापूर येथील घटना.

After catching the copy, the student jumped into the river Pravara attempt Suicide

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातून धाकादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील बेलापूर येथील एका विद्यालयात अकरावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीची कॉपी पकडली गेली. तिने निराशेतून प्रवरा नदीपात्रात उडी मारली. बुधवारी (दि. ५) दुपारी ही घटना घडली. स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

प्राध्यापकांनी विद्यार्थिनीची कॉपी पकडल्याने, तिने हे कृत्य केल्याचे स्थानिकांनी सांगितले. राग अनावर झाल्याने तिने उत्तरपत्रिका फाडली आणि वर्गाबाहेर पळत गेली. त्याच नैराश्येतून तिने प्रवरा नदीपात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्राध्यापक वर्गाची धांदल परीक्षा सुरू आहेत. उडाली. प्रवरा नदीवरील पुलावरून विद्यार्थिनीने नदीपात्रात उडी मारली. त्याच वेळी मासेमारी करणारे तरुण नदीपात्राजवळ बसलेले होते. त्यांनी नदीत झेप घेत, मुलीला बाहेर काढले. विद्यार्थिनी ही उक्कलगाव येथील आहे. बेलापूर येथील पोलिस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. विद्यार्थिनीला तातडीने बेलापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचाराकरिता श्रीरामपूर येथे हलविण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कॉपी न करण्याची सामूहिक शपथ विद्यार्थ्यांना दिली होती. तशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: After catching the copy, the student jumped into the river Pravara attempt Suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here