अकोले: अॅड. श्री.मनोहर एन. देशमुख यांचे श्रीराम शक्तीच्या स्वरूपात राजकार्य, समाजकार्य, धर्मकार्य
अॅड. श्री.मनोहर एन. देशमुख यांचे श्रीराम शक्तीच्या स्वरूपात राजकार्य, समाजकार्य, धर्मकार्य
केळुंगण: मानवी जीवनात प्रत्येक दिवसाची सुरुवात एकमेकाला राम राम करून होते. तर जीवनाचा शेवट हा बोलो भाई राम असे म्हणून होतो. इतका आपला आयुष्यात राम ओतप्रोत भरलेला आहे. आपले आयुष्य कितीही केले तरी अपुरे आहे. त्याला परीपुर्णेतेकडे नेण्यासाठी श्रीराम कथा आहे. कारण श्रीरामाचे जीवन म्हणजे मानवी जीवनाच्या सद्गुणांचे साक्षात परतिक आहे. आपल्याला आदर्श समोर असावा लागतो. म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणे सोयीचे जाते. रामायण हि एक दिशा आहे. कारण ते आबालवृद्धाला मनापासून आवडते. श्रीरामाने केलेले कार्य समाज जीवनाचा आदर्श आहे. हा ईश्वरी शक्तीचा संकेत होता. असे म्हंटले तर वावगे होणार नाही. हि केवळ राजा दशरथाच्या राजघराण्याची किंवा श्रीरामाच्या विलाक्षन पराक्रमाची गाथा नाही तर त्यामधून समाज जीवनाला आवश्यक असणाऱ्या संस्काराचे महत्व बिंबविण्याचा प्रयत्न झालेला आहे.
रामायण हि केवळ श्रीरामाची कथा नाही तर आपल्या उज्वल संस्कृतीच्या भविष्याला भाग्यवान बनवणारी भाग्यरेषा आहे. श्रीराम हि व्यक्ती न राहता ती एक शक्तीच्या स्वरूपात जनतेने स्वीकारली व तिला देवत्व बहाल केले. कित्येक महापुरुषांनी त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन राजकार्य, समाजकार्य, धर्मकार्य केलेले आहे.
सध्या हे कार्य मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ व सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अॅड. श्री. मनोहर एन. देशमुख त्याच निष्ठेने करीत आहे. ते मोठे समाज कार्य करीत आहे. आपल्याला जे प्राप्त झालेले आहे ते समाजासाठी बहाल करीत आहे. दरवषी ते गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके भेट देण्याचे कार्य करीत असतात त्याचप्रमाणे आज श्रीराम नवमी निमित्त कै. नानासाहेब विठोबा देशमुख वृद्धाश्रम केळुंगण येथे शाळेतील विद्यर्थ्याना वह्यांचे वाटप केले यातून मानवी जीवन समृद्धीकडे नेण्याचा व प्रेमाची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी श्री.मनोहर एन. देशमुख यांनी मुलांना सामाजिक जीवनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव आदरणीय श्री. टी. एन. कानवडे व सत्यानिकेतन संस्थेचे संचालक श्री. एन.डी. बेल्हेकर उपस्थित होते.
Website Title: Adv M N Deshmukh form of Shriram Shakti, social work