मराठी कलाविश्वातील जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
सातारा: कोविड व निमोनियामुळे जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्राणज्योत मालवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झालेली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रतिभा हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज पहाटे ४ वाजता त्यांचे निधन झाले आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आशालता वाबगावकर अनेक चित्रपट केल्यानंतर त्यांनी त्यांचा कल मालिकांकडे वळविल्या होता. या आई माझी काळूबाई या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाचे संक्रमण होऊन करोना लागण झाली. त्यांनतर मागील पाच दिवसांपासून त्यांच्यावर सातारा येथील प्रतीक्षा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, मात्र अति संसर्गामुळे त्यांच्या शरीराने साथ न दिल्याने त्यांचे निधन झाले. अखेरच्या क्षणी आशालता यांच्या सोबत अलका कुबल होत्या असे सांगण्यात येत आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: actress Ashalta Wabgaonkar passes away