Home अहमदनगर अहमदनगर: भाजपा नगरसेवकासह ८ जणांच्या टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई

अहमदनगर: भाजपा नगरसेवकासह ८ जणांच्या टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाचा नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह त्याच्या ८ जणांच्या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बाळासाहेब शेखर यांनी मंजूर केला.

Action under Mokka against a gang of 8 including BJP corporator

अहमदनगर: नगर महापालिकेतील भाजपाचा नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह त्याच्या ८ जणांच्या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बाळासाहेब शेखर यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे या टोळीवर पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा आदेश पारित केला आहे.

स्वप्नील रोहिदास शिंदे (वय-४०वर्षे, रा. वैदुवाडी सावेडी अहमदनगर), (२) अभिजीत रमेश बुलाख (वय-३३ वर्षे, रा. गजराज फॅक्टरी जवळ सावेडी अहमदनगर), (३) सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे (वय २५ वर्षे, रा. भुतकरवाडी, सावेडी, अहमदनगर), (४) महेश नारायण कुऱ्हे (वय – २८ वर्षे, रा. वाघमळा सावेडी अहमदनगर), (५) अक्षय प्रल्हादराव हाके (वय ३३ वर्षे, रा नंदनवन कॉलनी भिस्तबाग चौक, सावेडी अहमदनगर), (६) मिथुन सुनिल धोत्रे (वय-२३ वर्षे, रा. पवननगर सावेडी अहमदनगर), (७) राजु भास्कर फुलारी (वय-२३ वर्षे, रा. पवननगर अहमदनगर), (८) अरुण अशोक पवार (वय-२३ वर्षे, रा. मोरे चिंचोरे, वडारगल्ली. ता. नेवासा) यांच्या विरुध्द मोका कायदयान्वये वाढीव कलम लावण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

दि. १५ जुलै२०२३ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एकविरा चौक, अहमदनगर येथे यातील अंकुश दत्तात्रय चत्तर (वय ३५ वर्षे, रा. पदमानगर अहमदनगर) यांस नगरसेवक स्वप्निल शिंदे याचे सोबत असलेल्या जुन्या वादातून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने दोन काळया रंगाच्या चारचाकी गाडयामधुन १) नगरसेवक स्वप्निल शिंदे २) अभिजित बुलाख, ३) सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, ४) विभ्या कांबळे, ५) महेश कु-हे, ६) राजु फुलारी असे व त्यांचे सोबत असलेले इतर ७ ते ८ लोकांनी येवुन नगरसेवक स्वप्निल शिंदे यांनी दिलेल्या चिथावणी वरुन त्यांचे हातामधील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे व महेश कुऱ्हे याच्या हातामध्ये बंदुक (गावठी कट्टा) घेवुन येवुन जोरजोरात आरडा ओरडा करुन दहशत निर्माण करुन रोडने येणारे जाणारे व दुकानदारावर धाक निर्माण करुन अंकुश दत्तात्रय चत्तर यास डोक्यात जिवे मारण्याचे उद्देशाने जबर मारहाण करुन जखमी केले होते. उपचारादरम्यान चत्तर याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्व आरोपींवर भा.दं.वि.कलम ३०२, ३२६, ३२५, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०८, ३४१, आर्म अॅक्ट ३/२५ म.पो.का.कलम ३७ (१) (३) /१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, पो.ना. संतोष खैरे यांनी सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना मोका कायद्यातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणे कामी अहवाल सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Action under Mokka against a gang of 8 including BJP corporator

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here