Home बीड धक्कादायक! मुकादमाने ऊस तोड महिलेवर अत्याचार करून अश्लील फोटो केले व्हायरल

धक्कादायक! मुकादमाने ऊस तोड महिलेवर अत्याचार करून अश्लील फोटो केले व्हायरल

Beed Crime: बीडमध्ये आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर अत्याचार करत अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

Accused abused sugarcane harvester, makes obscene photos go viral

बीड : बीडच्या दिंद्रुडमध्ये एक हैराण करणारी घटना घडलीये. ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर अत्याचार करत अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलीत. अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर मजूर महिलेला इतका जास्त धक्का बसला की, तिने थेट विष पिऊन आत्महत्या करण्याचा थेट प्रयत्न केला. या प्रकारानंतर हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये गेले.

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या मुकादमाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार हा फरार झाला आहे. ऊसतोडी करिता घेतलेल्या उचल रक्कमेतील बाकी देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर अत्याचार करण्यात आले. आरोपी मुकादम हा तितक्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेचे अश्लील फोटो देखील गावातील ग्रुपवर व्हायरल केली.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा हा चर्चेत असल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपी कोठडीत असून एक फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ज्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बीड जिल्हा चर्चेत असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय.

Web Title: Accused abused sugarcane harvester, makes obscene photos go viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here