आजीचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करून पसार झालेला आरोपी राजूर पोलिसांनी केला जेरबंद
राजूर | Rajur Murder Case: अखेर पेंडशेत येथील आजीचा खून करून पसार झालेला आरोपी नातू सुनील मंगळा पदमेरे राजूर पोलिसांकडून अवघ्या ४८ तासांच्या आता जेरबंद करण्यात आला आहे. साधारण एक वर्षांपूर्वी खिरविरे येथील आजोबाने नातवाच्या ९ तुकड्यात खांडोळ्या खांडोळ्या करत निर्घृण हत्या केली होती त्याचाही तपास राजूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला होता. खाकीचा धाक अजूनही आरोपींविरुद्ध असल्याचे यावरून सिद्ध होते.
याविषयी राजूर पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती वरून दारूच्या नशेत असलेल्या आपल्याच नातवाने दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशाने आजीचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करून पसार झालेला आरोपी सुनील मंगळा पदमेरे याच्या बुधवारी रात्री खून झाल्याच्या अवघ्या ४८ तासांत मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी हा खून झालेल्या आजीचा नातूच असून तो त्याच्या बहिणीकडे टाकेद या ठिकाणी पसार झाल्याचे राजूर पोलिसांना समजताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह दोन पथकांनी तातडीने टाकेदच्या दिशेने धाव घेत आरोपी यांस टाकेद येथून बहिणीच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्यास जेरबंद केले. या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस आनंद मैड, गणेश शिंदे, हवालदार देविदास भडकवाड, प्रवीण थोरात, दिलीप डगळे, कैलास नेहे, अकोले पोलीस ठाण्याचे राकेश मुळाने, विजय मुंढे, विजय फटांगरे, मनोहर मोरे, होमगार्ड सोमनाथ उगले आदींनी उत्तम कामगिरी बजावली.
Web Title: Accused Rajur arrested for brutally Murder