संगमनेरातील शोरूम व अकोलेतील स्टार मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी अटकेत
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहराजवळ असणाऱ्या शान कारचे शोरूम फोडून १ लाख २० रुपयांची रोकड तसेच अकोले शहरातील स्टार मोबाईल शॉपी फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना सिन्नर ता. नाशिक येथून संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे.
विजय सुदाम कातोरे (वय २०), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय २१), विजय सखाराम गिऱ्हे (वय २०) रा.शिवडे, ता.सिन्नर, जि.नाशिक असे आरोपींचे नावे आहेत. या चोरट्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता होंडाइ शोरूम मध्ये चोरी केल्याची कबुली दिली तसेच अकोले शहरातील स्टार मोबाईल फोडल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. त्यांना सिन्नर या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून असून दुचाकी, ७ मोबाईल, रोख रक्कमेसह १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निकिता महाले हे करीत आहे.
Web Title: Accused of the busting showroom in Sangamner