Home अहमदनगर अहमदनगर: अत्याचारातील आरोपी बेड्या तोडून पसार

अहमदनगर: अत्याचारातील आरोपी बेड्या तोडून पसार

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची घटना.

accused in torture broke the shackles and escaped

शेवगाव: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची घटना शेवगाव येथे शनिवारी घडली. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महिनाभरात आरोपी पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी येथील पोलिस निरीक्षकांना चांगलेच फैलावर घेतले.

याबाबत माहिती अशी, की तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस ‘तू मला फार आवडते. माझ्याशी प्रेमसंबंध ठेव,’ असे म्हणत एका तरुणाने मुलीसोबत फोटो घेतला व तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी (दि.३) घडली. याबाबत शनिवारी (दि. ४) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लगेच दुपारी त्या गावात जाऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस तत्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यातील तुरुगाच्या पडवीत बसवले. या वेळी त्या आरोपीच्या एका हातात बेडी व बेडीचा दुसरा भाग टेबलच्या पायाला कुलपबंद केला. त्याची चावी त्याच टेबलच्या कप्प्यात ठेवण्यात आली होती. सायंकाळी सदर आरोपीच्या अटकेसाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू असताना काही वेळ तुरुंगरक्षक मोबाईलवर बोलत बाहेर गेला. ही संधी साधून आरोपीने टेबलच्या कप्प्यात असलेली बेडीची चावी मोकळ्या असलेल्या हाताने घेतली आणि बेडीचे कुलूप उघडले आणि तेथून धूम ठोकली. ही घटना घडली. आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांची धावपळ सुरू झाली.

दरम्यान, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही, आरोपी पळून गेल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना कळताच त्यांनी पोलिस निरीक्षक दिगंबर भताणे यांना चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असली तरी दबक्या आवाजात याची चर्चा चालू होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी दोन गटांत तीक्ष्ण हत्याराने हल्ला झालेल्या गुन्ह्यातील तीन आरोपींना २२ एप्रिल रोजी पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता यातील मज्जू ऊर्फ मुद्दसर सय्यद हा आरोपी तेथून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. त्या वेळी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने शोध मोहिम हाती घेतल्याने जवळच शेतातील पिकात त्यास पकडण्यात आले होते, याबाबत कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याच्या प्रकरणी त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपी सापडल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कणखर भूमिका घेतली नाही. मात्र ही घटना होऊन महिना होताच आता पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून जाण्याची दुसरी घटना घडल्याने पोलिसांची लखतरे वेशीला टांगली गेली आहेत. पोलिसप्रमुखांनी दोन्ही घटनांचा खुलासा मागविल्याचे समजते. त्यानंतर ते कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

अटकेची कागदपत्रे पूर्ण करण्याच्या अगोदरच पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. अद्याप तो हाती लागला नसला तरी याबाबत पळून गेल्यासंबंधीचा दुसरा गुन्हा अद्याप दाखल केला नाही. यावरून घटनेबाबत गुप्तता का पाळण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: accused in torture broke the shackles and escaped

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here