अकोलेतील दुहेरी हत्याकांडातील आरोपी बापूला अटक, हत्येचे कारण समोर आले
Breaking News | Akole Murder Case: दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात.
अकोले: अकोले तालुक्यातील बेलापूर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी बापूला अखेर १६ तासांनी अकोले पोलिसांना पकडला आहे. दोन हत्यांचे कारण समोर आले आहे. बेलापूर गावातील प्रकाश दत्तात्रय फाफाळे उर्फ बापू वय ४५ वर्ष याने दोन भावजया यांचा खून करून करून पसार झाला होता. जमीन वाटपाच्या व पैशाच्या किरकोळ वादातून एक सख्खी भावजयी व तिला साथ देणारी चुलत भावजयी या दोघींचा कोयत्याने निर्घुण खून केल्याची घटना काल दुपारी घडली.
आठ ऑक्टोबर मंगळवारी सकाळी सात वाजता संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील जंगल रस्त्यावर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जमिनीच्या वाटपावरून वारंवार भांडणे होत होती. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहे. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले.
दशक्रियाविधीचे पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या वादातून अकोले तालुक्यातील बेलापूर (बदगी) येथे दत्तात्रय प्रकाश फापाळे (वय ५०) याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (वय ३८), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (वय ४०) यांचा सोमवारी दुपारी धारदार कोयत्याने हत्या केली. विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून पन्नास फुटांवरील अंतरावर झाला. घटनास्थळी रक्ताचे मृतदेह अक्षरक्षः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या, समोरच एका डॉक्टरांना हा आवाज गेला. ते बाहेर आले तेव्हा दत्तात्रय फापाळे याने रक्ताळलेल्या कोयत्याने त्यांना धमकावले. त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेने निघून गेला. घटना कळताच अकोल्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे तातडीने तेथे पोहोचले. उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वैशालीचा विनाकारण जीव गेला वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या. उज्ज्वला दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. वैशाली घटनास्थळाशेजारी दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला. दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले. दिनेश आहेर, पोलिस कर्मचारी सुहास गोरे, किशोर तळपे, विजय खाडे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
पन्नास हजारांसाठी केला खून आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मयत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मजुरी करून गुजराण करत होते. मयत उज्ज्वलाने दोन्ही मुले माहेरी ठेवली म्हणून ती वाचली. कुटुंबाकडे फक्त पन्नास गुंठे शेती आहे. त्यात दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. भावाच्या दशक्रियेला दत्तात्रय याने भावजयीला पन्नास हजार रुपये दिले होते. या पैशावरून वाद व्हायचे. याच रागातून दत्तात्रय याने आधीच घरात कोयता आणला होता.
Web Title: Accused in Akole double murder, Bapu arrested, reason for murder revealed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study