अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन सामुहिक अत्याचारप्रकरणी आरोपींस अटक
लोणी | Kidnap: अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी पोलीस ठाण्यात १९ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दाखल केली होते. मुलीस पळून नेल्याची माहिती समोर आली होती. अनिकेत दत्तात्रय सकट वय २० रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना याने मुलीस पळून नेले होते. पोलिसांनी तपास काढला असता अनिकेत सकट हा मुलीसह सुरत(गुजरात) येथे असल्याचे समजले. मात्र पोलीस पथक जाण्याआधीच तो त्या ठिकाणाहून फरार झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली २७ फेब्रुवारी २०२१ रोजी तो मुलीसह मिरजगाव (अहमदनगर) येथे असल्याचे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्यांनतर मुलीने तिच्या सोबत घडलेली व्यथा तिने पोलिसांना सांगितली. अनिकेत दत्तात्रय सकट याने माझ्यावर अत्याचार केला. तसेच त्याचे मित्र चंदन सत्यदेव यादव, मोनालाल हिरालाल यादव, विकास ओमप्रकाश सिंग रा. उत्तरप्रदेश यांनी मला व अनिकेतला दारू पाजून अत्याचार केला. हा गुन्हा सुरत शहरात घडला. बुधवारी २६ मे रोजी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपी विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील करीत आहे.
Web Title: Accused arrested for kidnap a minor girl