संगमनेर: बॅंकेस २३ जणांनी घातला ८२ लाखांस गंडा, गोल्ड व्हॅल्यूवरचा समावेश
Sangamner News: जी. एस. महानगर कॉ. ऑपरेटिव्ह बँकेत 23 खातेदारांनी बनावट सोने ठेऊन बँकेची तब्बल 82 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार.
संगमनेर: शहरातील विद्यानगर येथील जी. एस. महानगर कॉ. ऑपरेटिव्ह बँकेत 23 खातेदारांनी बनावट सोने ठेऊन बँकेची तब्बल 82 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी 23 जणांविरुद्ध शहर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. संगमनेर शहरातील तिसरी बँक आहे की ज्यामध्ये खातेधारकांनी बँकेला गंडा घातल्याचे समोर आले आहे.
संगमनेरातील जी. एस. महानगर बँकेत दि. 1 जुलै 2016) साली अधिकृतरित्या जगदीश शहाणे हा गोल्ड व्हॅल्यूअर नेमण्यात आला. त्याच्याकडून अर्जदारांना सोने खरे की खोटे, याबाबत अधिकृत प्रमाणपत्र दिले जात होते. त्यानुसार बँकेत सोने तारण ठेवणाऱ्या कर्जदारांना बँकेने कर्ज वाटप केले गेले, मात्र याबँकेचा मुख्य जगदीश शहाणे याच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्जदारांना खोटे सोने देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो संगमनेरातुन पसार झाला आहे.
गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे जी. एस. महानगर बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयीन वरिष्ठांना दिली. बँकेच्या कार्यकारी संचालकांनी तत्काळ सोने तारण ठेवणाऱ्या सर्व कर्जदारांना बँकेत हजर राहण्याबाबत दोनदा नोटिस दिल्या. काही कर्जदार हजर राहिले. यावेळी सद्याचे बँकेचे व्हॅल्यूअर गणेश बेल्हेकर यांनी 49 कर्जदारांचे सोने तपासले असता तब्बल 23 कर्जदारांचे सोने खोटे असल्याचे आढळले.
हे सर्व कर्जदार गोल्ड व्हॅल्यूवर जगदीश शहाणे यास माहित असतानाही त्याने बँकेला खोटे प्रमाणपत्र सादर करून, बँकेची फसवणूक केली. याबाबत जीएस महानगर बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी 23 जणांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पो. नि. भगवान मथुरे व पो.उ.नि. निवांत जाधव करीत आहेत.
यामध्ये गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे गोल्ड व्हॅल्यूवर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. एकता चौक मालदाड रोड), व कर्जदार पुढीलप्रमाणे राजेश केशवराव नेवासकर (रा. गणेशनगर), शशिकला विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी), शरद मारुती परर्बत (रा. ढोलेवाडी), महेश रामचंद्र जोशी (रा. घुलेवाडी), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. साळीवाडा), योगेश शंकर सुर्यवंशी (रा. ढोलेवाडी), संदिप नंदलाल काळंगे (रा. इंदिरानगर), आयुब उस्मान पठाण (रा. घुलेवाडी), नवनाथ भरत घोडेकर (रा. घोडेकरमळा), नाजीम अब्दुलमान शेख (रा.) मोगलपुरा), रविंद्र रमेश राजगुरू, नाजाम अब्दुलमान शेख (रा. मोगलपुरा), रविंद्र रमेश राजगुरू (रा. मालदाड रोड), सचिन मनलभाऊ होलम (रा. सय्यदबाबा चौक), अनिल राजाराम पावबाके (रा. पावबाकी रोड), ज्ञानेश्वर त्रंबक पगारे (रा. घुलेवाडी), राजेंद्र काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी), प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड), रामभाऊ भावका पुणेकर (रा. डीग्रस), विशाल काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी), उषा शिवाजी दुधवडे (रा. सावरगावतळ), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. घुलेवाडी), राजेश विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी) हे सर्व संगमनेर शहरासह तालुक्यातील रहिवाशी आहेत.
Web Title: Account holders defrauded the bank to the tune of Rs 82 lakh 58 thousand by keeping fake gold
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App