अहिल्यानगर: मतदानासाठी येत असताना पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: पिता-पुत्राचा सुपा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू.
राहुरी: राहुरी शहरातील कासार समाजातील कामानिमित्त सध्या पुणे येथे कार्यरत असलेले मनोज हरिभाऊ रासने व त्यांचा मुलगा सुजल मनोज रासने या पिता-पुत्राचा सुपा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी पुण्याहून मनोज रासने व मुलगा सुजल हे मतदानासाठी राहुरीकडे येत असताना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सुपा परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन रासने हे जागीच ठार झाले.
तर मुलगा सुजलला स्थानिकांनी गंभीर अवस्थेत सुपा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुजलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचीही प्राणज्योत मालवली. बुधवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही पिता-पुत्रांवर राहुरी येथील गणपती घाट स्मशानभुमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Accidental death of father and son while coming to vote
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study