Home पुणे हृदयद्रावक घटना: आईसमोर मुलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक घटना: आईसमोर मुलाचा अपघाती मृत्यू

Accident:  पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकखाली चिरडला गेल्याने आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

Accident death of child in front of mother

पिंपरी: मुलाला स्कुटीवरून शाळेत घेऊन जात असताना कारचा धक्का लागल्याने मुलगा रस्त्यावर कोसळला. दरम्यान पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकखाली चिरडला गेल्याने आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२४) सकाळी साडे सातच्या सुमारास जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नर येथे हा अपघात झाला.

अथर्व रवींद्र आळणे (वय ११, रा.सोहेल रेसिडेन्सी, स्पाईन रोड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हर्षदा आळणे हा त्यांचा मुलगा अथर्व पाला घेऊन स्कुटीने शाळेत सोडवण्यासाठी जात होत्या. दरम्यान जुन्या आरटीओ जवळ शाहूनगर कॉर्नर येथे आले असता स्कुटीला एका रस्त्यातील खड्ड्यामुळे मुळे भरधाव कारने धक्का दिला. यावेळी दोघेही मायलेक खाली पडले. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या  एका मालवाहू ट्रकने अर्थवाला चिरडले तसेच काही अंतरावर फरफटत नेले. तर हर्षदा या दुसऱ्या बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. मात्र गंभीर जखमी झालेल्या अथर्वचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यासमोरच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हर्षदा यांनी हंबरडा फोडला. यातील कारचालक तसेच ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या घटनेमुळे आहे. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

सकाळच्या या चौकामध्ये गर्दी होत असून अनेक मोठ्या वाहनांची रहदारी असते. या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाले असून पूर्णवेळ वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे. या ठिकाणी मोठा खड्डा असून खड्डयात गाडी आदळल्यामुळे अथर्वचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली.

Web Title: Accident death of child in front of mother

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here