नियोजित वराचा अपघाती मृत्यू, तरुणीची आत्महत्या
Breaking News | Jalgaon Suicide: नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याच मृत्यूच्या विरहात २९ असलेल्या तरुणीने कॉलनीतील घरात गळफास घेऊन सा आत्महत्या केल्याची घटना.
जळगाव: आत्याच्या मुलासोबत २८ लग्न ठरले होते. काही महिन्यांत हे. लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, संसार फुलण्याच्या आधीच दोन महिन्यांपूर्वी नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याच मृत्यूच्या विरहात २९ असलेल्या तरुणीने कॉलनीतील घरात गळफास घेऊन सा आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ध्ये सकाळी १० वाजता उघडकीस आली. बैल या प्रकरणी रामानंदनगर पोलिस दा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या दुहिताचे आतेभावाशी लग्न ठरले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूचा दुहिताला मोठा धक्का बसला होता. यामुळे ती खूप दुःखी झाली होती. सकाळी १० वाजता घराच्या एका खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यापूर्वी तिने आपल्या हातालाही चाकूने कापून घेतले होते. त्यामुळे हातालाही जखम झाली होती.
Web Title: Accidental death of arranged groom, suicide of young lady
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study