Accident: दुचाकी झाडावर धडकल्याने तरुण ठार
Nashik: भागातील एका झाडावर भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना.
नाशिक: गंगापूर शिवारातील काळेनगर भागात संत कबीरनगरकडून सातपूरच्या दिशेने जाताना काळेनगर भागातील एका झाडावर भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.५) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली.
संदीप रंगनाथ पोटिंबे (३३, रा. याला गिरणारे), असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोटिंबे सातपूर परिसरातील कामाला होता. दुकानातील काम संपवून तो जात असताना काळेनगर भागात त्याची दुचाकी भरधाव वेगात झाडावर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोटिंबे तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Web Title: Accident young man was killed when his bike hit a tree
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App