Accident | एसटी बस दरीत थेट कोसळली, भीषण अपघात
पालघर | Palghar: बस चालकचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. पालघर येथील वाघोबा खिंडीत एस. टी. महामंडळाच्या रातराणी बसचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.
या अपघातात बसमधील 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. अपघातातील जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Web Title: Accident ST bus crashed directly into the valley