अहिल्यानगर: कारच्या धडकेत सुरक्षारक्षक ठार
Breaking News | Ahilyanagar Accident: पेट्रोलपंपासमोर कारची धडक बसून, सुरक्षारक्षकाचा मृत्यू.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा एमआयडीसीमधील पेट्रोल पंपाजवळ कारने मोटारसायकलला धडक दिल्याने विजय तुकाराम थिटे (४४, रा. सुपा) या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.
सोमवार, ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ‘ओमकार सेफ्टी’मध्ये काम करणारे थिटे त्यांच्या मोटारसायकलमध्ये (एमएच १५ एटी ३०१०) पेट्रोल भरण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
पेट्रोल पंपासमोरील दुभाजकाजवळ त्यांच्या मोटारसायकलला एका कारने (MH 12 SU 2900) धडक दिली आणि त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पारनेर | सुपा : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सुपा एमआयडीसीतील पेट्रोलपंपासमोर कारची धडक बसून, सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. सोमवारी (४ ऑगस्ट) रात्री १० वाजता हा अपघात झाला.
विजय तुकाराम थिटे (वय ४४, रा. सुपा) असे मृताचे नाव आहे. याबाबत बुधवारी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोमवारी रात्री दहा वाजता एमआयडीसीतील ‘ओमकार सेफ्टी’ कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे विजय थिटे हे मोटारसायकलमध्ये (एमएच १५ एटी ३०१०) पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात होते. पंपासमोरील दुभाजकाजवळ त्यांच्या दुचाकीस कारची (एमएच १२, एसयू २९००) धडक बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या थिटे यांना तातडीने नगरच्या रुग्णालयात दाखल केले.
Breaking News: Accident Security guard killed in car crash