Accident: धावत्या रेल्वेतून पडून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
Accident: कर्तव्यावर जात असताना रेल्वेत बसलेले असताना रेल्वेतून खाली पडून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना.
परभणी: परभणीत कर्तव्यावर जात असताना धावत्या रेल गाडीतून पडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या रेल्वे स्थानकावर घडली. दत्तराम श्रीराम घाग असेया मृत्यू झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मयत पोलीस उपनिरीक्षकाला दसरा सणानिमित्त परभणी येथे दंगा नियंत्रण पथकात तैनाती करण्यात आली होती. ते कर्तव्यावर जाण्यासाठी हैदराबादवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वेत बसले होत. या दरम्यान परभणी रेल्व स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून निघाल्यानंतर ते रेल्वेतून खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परभणी पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे.
Web Title: Accident Police sub-inspector dies after falling from running train