संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
Sangamner Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील विद्यानिकेतन कॉलेजजवळील घटना.
घारगाव: नाशिक पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ३० ते ३५ वर्षे वयाच्या पादचारी अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील जोरदार विद्यानिकेतन कॉलेजजवळ रविवारी (दि. १) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतकाच्या डोक्यावरून भरधाव वाहनाचे चाक गेल्याने मृतकाची ओळख पटली नाही. घारगाव पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रविवार, १ जानेवारीच्या रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने बोटा परिसरातील विद्यानिकेतन कॉलेजजवळ पादचारी व्यक्तिला धडक दिली. या अपघातात मृतकाच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
अपघातानंतर घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, संतोष फड यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. मृतदेह विच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. सदर मृत व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, बदामी रंगाची पँट असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
Web Title: Accident One person died after being hit by a speeding vehicle
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App