Home नाशिक सोयरिक जुळवायला निघाले अन् वाटेतच काळाने गाठले, मुलाच्या पित्याचा मृत्यू

सोयरिक जुळवायला निघाले अन् वाटेतच काळाने गाठले, मुलाच्या पित्याचा मृत्यू

Kasara Accident: वैतरणा धरणाच्या पुलाजवळ २०० फूट खोल दरीत कोसळले. यात मुलाचे वडील यांचा मृत्यू.

Accident on the way met with time, the death of the boy's father

कसारा : शहापूर तालुक्यातील माळगावातील झुगरे कुटुंब मुलासाठी सोयरिक जुळवण्यासाठी मंगळवारी पालघर जिल्ह्यातील खोस गावाकडे निघाले होते. अचानक वाटेतच चारचाकी वाहन विहिगाव-खोडाळा मार्गावरील अप्पर वैतरणा धरणाच्या पुलाजवळ २०० फूट खोल दरीत कोसळले. यात मुलाचे वडील दादू झुगरे यांचा मृत्यू झाला, तर चालकासह ७ जण जखमी झाले आहेत. त्यात २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

कसारापासून १४ किमी. अंतरावर असलेल्या माळगाव वस्तीतील रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी दादू झुगर हे आपल्या कुटुंबासोबत मुलाला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी एका खासगी वाहनाने पालघर

खोस गावात निघाले होते. विहिगाव सोडताच एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट २०० फूट खोल दरीत कोसळले. खालच्या बाजूला असलेले अप्पर वैतरणा जलाशयाच्या काठेवर असलेल्या खडकावर जाऊन आदळले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी जखमींना दरीतून मुख्य रस्त्यावर आणून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले. यात कुटुंबप्रमुख दादू झुगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले, तर या अपघातात सन्या ठाकरे, भारती झुगरे, सुरेश ठोंबरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे असून, यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यासह इतर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Accident on the way met with time, the death of the boy’s father

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here