Home अहिल्यानगर अहिल्यानगर: समृद्धी महामार्गावर अपघात, युवकाचा मृत्यू

अहिल्यानगर: समृद्धी महामार्गावर अपघात, युवकाचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर अकोलेजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू.

Accident on Samruddhi Highway, youth dies

अहिल्यानगर : विवाह समारंभासाठी नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर अकोलेजवळ झालेल्या अपघातात एमआयडीसी, नवनागापूर येथील विवेक संतोष आजबे (वय १७) याचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २७) पहाटे हा अपघात झाला.

मृत विवेक हा त्याच्या चुलत भावाच्या विवाह समारंभासाठी नागपूरला जात होता. समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असताना अकोल्याजवळ शेलूबाजार येथे पहाटेच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले. या अपघातात तिघे जखमी झाले, मात्र विवेक गंभीर जखमी झाला होता. अपघात झाल्यानंतर विवेकचे वडील संतोष आजबे यांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. मात्र, दोन ते अडीच तास उलटूनही रुग्णवाहिका पोहोचली नाही. आजबे यांच्या कुटुंबीयांचे दुसरे वाहन मागे होते. या वाहनातून जखमी विवेकला अकोले येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

या प्रवासात मिळालेल्या एका प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात रुग्णवाहिका आढळली, मात्र ती रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगण्यात आले. तसेच पर्यायी रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. अर्ध्या तासात रुग्णवाहिका पोहोचली असती तर मुलाचा जीव वाचला असता, असे आजबे यांनी सांगितले.

Breaking News: Accident on Samruddhi Highway, youth dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here