अहमदनगर: समृद्धीवर अपघातः दोघांचा मृत्यू, कोर्टात निघाले अन
Breaking News | Ahmednagar: दोघे प्रवास करीत असलेल्या कारची पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक बसली. यात दोघांचा मृत्यू.
कोपरगाव: उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) रोजी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावादरम्यान समृद्धी महामार्गावर घडली. दोघे प्रवास करीत असलेल्या कारची पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी कल्पेश दीपक गरत व सचिन सोपान धडकली
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावादरम्यान समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात कारची झालेली अवस्था. पाटील (वय अंदाजे ३० ते ३५) हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात कामानिमित्त कारने (एमएच ०५ सीके ७००) निघाले होते. त्यांची कार समृद्धी महामार्गावरून जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडेदरम्यान असताना समोर असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून चक्काचूर झाला होता, कल्पेश गुरव व सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांना माहित मिळताच घटनास्थळी पोहोंचले दोघांचे मृतदेह कोपरगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठ आणण्यात आले होते.
Web Title: Accident on Samridhi Two died, went to court
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study