Home पुणे भीमाशंकरला जाताना एसटी बस थेट २० फुट दरीत कोसळली, ३५ जण प्रवास...

भीमाशंकरला जाताना एसटी बस थेट २० फुट दरीत कोसळली, ३५ जण प्रवास करताना अपघात

Pune: दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात (Accident), बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून बसमधून एकूण ३५ जण प्रवास करत.

Accident On its way to Bhimashankar, the ST bus fell directly into a 20 feet ravine

पुणे: कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाल्याची घटना सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.  पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून बसमधून एकूण ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कल्याण येथून भीमाशंकर येथे निघालेल्या बस चालकाचे नियंत्रण आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ असणाऱ्या ओढ्यात सुटले. त्यामुळे बस वीस फूट खोल दरीत कोसळली. यात पाच जण जखमी झाले आहेत. तर अन्य सुखरूप आहेत. बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी प्रवास करत होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले. तसेच पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामंडळाची ही बस कल्याण येथून भीमाशंकला जात असताना हा अपघात घडला आहे.

Web Title: Accident On its way to Bhimashankar, the ST bus fell directly into a 20 feet ravine

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here