Home महाराष्ट्र ट्रॅक्टर व मोटारसायकलचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

ट्रॅक्टर व मोटारसायकलचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Breaking News | Accident: उसाने भरलेल्या दोन ट्रॉलीसह निघालेला ट्रॅक्टर व मोटारसायकल यांची समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना.

accident involving tractor and motorcycle, three dead

निलंगा : उसाने भरलेल्या दोन ट्रॉलीसह निघालेला ट्रॅक्टर व मोटारसायकल यांची समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील अंबुलगा (मेन) गावाजवळ मंगळवारी (दि.१२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

मंगळवारी सकाळी राठोडा येथील गोविंद पांडुरंग कांबळे (४५, रा. अंबुलगा मेन), दिनकर रावसाहेब तोंडवळे (४६) व गोविंद मारुती गायकवाड (२५) हे तिघे मोटारसायकलने हणमंतवाडी येथून अंबुलगा मेनकडे निघाले होते. त्याचवेळी अंबुलगाजवळ समोरुन येणाऱ्या उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांचा ट्रॅक्टरला. मोटारसायकल समोरून धकडली. या दुचाकीवरील तिघांनाही ट्रॅक्टरने चिरडले. या अपघातात गोविंद कांबळे व दिनकर तोंडवळे हे दोघे टायरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद गायकवाड या तरुणाला उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी संतप्त नातेवाईकांनी ट्रॅक्टरवर दगडफेक केली. घटनेचे गांभीर्य पाहून निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ हे कॉन्स्टेबल सुनील पाटील, विनोद गोमारे,

खंडू कांबळे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: accident involving tractor and motorcycle, three dead

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here