Home नांदेड एसटी बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; एक ठार

एसटी बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; एक ठार

Breaking News | Nanded Accident: एसटी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात, अपघातानंतर चालक तीन ते चार तास बोलेरो गाडीच्या स्टेरिंगमध्ये अडकून बसला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू.

accident involving ST bus and Bolero one dead

नांदेड : घाटातुन जातं असताना एसटी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपचा चालकाचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर चालक तीन ते चार तास बोलेरो गाडीच्या स्टेरिंगमध्ये अडकून बसला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवटच्या अंबाडी घाटात मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. पप्पू व्यंकटेश गंगुलप्पा (वय 42, रा. विनायकनगर, चित्तूर, आंध्रप्रदेश) अस मयत जीप चालकाच नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किनवट आगाराची बस क्रमांक एमएच 14 बीटी 2105 आज सकाळी उनकेश्वर येथून मांडवीकडे जात होती. अंबाडी घाटात येताच बस आणि बोलेरो जीपची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बोलेरो जीपला एसटी बसने रस्त्याखाली फरफटत नेले. एसटी बसच्या समोरील भागात बोलेरो जीपचा चालकाच्या बाजूचा भाग अडकला. त्यामुळे चालक जिपमध्येच अडकून पडला. तीन ते चार तास चालक स्टेरिंमध्ये अडकला होता.

दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि नागरिकांनी चालकाला जीपच्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तीन तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. जिपमध्ये केवळ चालकच होता, तर एसटी बसमध्ये 33 प्रवासी होते.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच किनवट आगार प्रमुख यशवंत खिल्लारे, विभागीय वाहतूक अधिकारी शकमलेश भारती आणि विभागीय यंत्र अभियंता कोरटकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. तसेच घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Breaking News: accident involving ST bus and Bolero one dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here