अहिल्यानगर: कार आणि दुचाकीचा भीषण अपघात युवकाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: बाभुळगाव शिवारामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन युवकाचा मृत्यू झाला तर दोघे युवक गंभीर जखमी झाले.
पाथर्डी: तालुक्यातील माळी बाभुळगाव शिवारामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन युवकाचा मृत्यू झाला तर दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. किरण लक्ष्मण धोत्रे (वय 20, रा. नाथनगर) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
अजय पिराजी पवार (वय 21, रा. शिक्षक कॉलनी) व सतीश उर्फ अन्नू बाबुराव पवार (वय 22, रा. नाथनगर, पाथर्डी) हे दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळी बाभुळगाव शिवारातील पाथर्डी-अहिल्यानगर रस्त्यावर हॉटेल प्रेम नजीक पाथर्डीवरून अहिल्यानगरकडे जाणार्या कारने पाथर्डीकडे येणार्या दुचाकीला धडक दिली.
गुरूवारी रात्री साडे 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे पुढील बंपर ठोकून दुचाकीचे पुढील चाक कारच्या ड्रायव्हर साईटच्या चाकामध्ये जाऊन गुतले. यात किरण धोत्रे हा मयत झाला. अपघातानंतर प्रथम या सर्व जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र यातील किरण धोत्रे याचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. सतीश पवार व अजय पवार हे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार अल्ताफ शेख करत आहेत.
Web Title: accident involving car and two-wheeler kills youth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study