Home अकोले अकोलेत कार व दुचाकीत भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

अकोलेत कार व दुचाकीत भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

Breaking News | Akole Accident: कोल्हार घोटी महामार्गावर चार चाकी व दुचाकी यांच्यात भीषण अपघातात ३८ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना.

accident involving a car and a two-wheeler in Akolet, death of a young man

अकोले शहरात नवलेवाडी फाटा या ठिकाणी कोल्हार घोटी महामार्गावर चार चाकी व दुचाकी यांच्यात भीषण अपघातात ३८ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

दीपक सुरेश पवार रा. पिंपरकणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान एम.एच. १२ जे, यु. ३१३५ या सफेद रंगाच्या स्विफ्ट कार व एम.एच १७. ५८१६ या बजाज  गाडीचा हॉटेल विजय समोर हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार दीपक पवार मयत झाला असून दीपक पवार हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. या अपघाताने त्याच्या कुटुंबावर दुखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Web Title: accident involving a car and a two-wheeler in Akolet, death of a young man

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here