भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडले, चिमुरड्याचा जागीच मृत्यू
Breaking News | Pune Accident: भरधाव इनोव्हा गाडीने एका लहान मुलाला चिरडले असून अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला.
पुणे : कोंढवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौकाजवळ भरधाव इनोव्हा गाडीने एका लहान मुलाला चिरडले असून अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी इनोव्हा गाडीच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून इओव्हा गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना रविवार सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
कोंढवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौकाजवळ भरधाव इनोव्हा गाडीने निवृत्ती बाजीराव किसवे (वय 13) या मुलाला उडवले. या अपघातात निवृत्ती किसवे हा मुलगा मृत पावला. इनोव्हा कारचा चालक जैद नसीर शेख वय 23 याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी इनोव्हा गाडीच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. चालकांने मद्य प्राशन केले होते का याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
Breaking News: Accident Inova Car crashesh child, death