Home Accident News दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात, कंटेनरने पेट घेतला, ४ जणांचा जळून मृत्यू

दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात, कंटेनरने पेट घेतला, ४ जणांचा जळून मृत्यू

Pune Accident: एका कंटेनरने दुसऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने अपघातात एका कंटेनरने पेट घेतला. या आगीत कंटेनर केबिन जळून खाक, या अपघात चार जणांचा मृत्यू झाला. दोघे बचावले.

accident in two containers, container catches fire, 4 people burn to death

पुणे: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ एका कंटेनरने दुसऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका कंटेनरने पेट घेतला. या आगीत कंटेनर केबिन जळून खाक झाले तर चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून यात तीन प्रौढ व्यक्तींचा समावेश असून एक जण अल्पवयीन आहे. तसेच, अपघात होताच दोन जणांनी वाहनांतून उडी घेतल्याने ते बचावले आहेत.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास एका कंटेनर मुंबईच्या दिशेने निघाला होता. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे कंटेनर पलटी झाला. ट्रकने आणखी एका वाहनाला धडक दिल्यानंतर धडक दिलेल्या ट्रकने पेट घेतला. ट्रकच्या केबिनमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य होते. चालकाने उडी मारून मदत मागितली. मात्र, तोपर्यंत चौघांचा जळून मृत्यू झाला होता. कंटेनरने पेट घेतला यावेळी कंटेनरमध्ये असलेल्या सहा जणांपैकी दोन जणांनी वाहनांतून उडी घेतल्याने ते बचावले असून चार जणांचा बाहेर पडता न आल्याने जळून मृत्यू झाला.

Web Title: accident in two containers, container catches fire, 4 people burn to death

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here