हेडफोनने घेतला तरुणीचा जीव, घटनेने परिसरात हळहळ
Accident News: हेडफोन वापरल्याने रेल्वेचा तरुणीला आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू.
नाशिक: माणसांकडून टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या इगतपुरीतून समोर आली आहे. हेडफोन लावून रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रियांका असे मयत मुलीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियांका कॉलेजमधून हेडफोन लावून मोबाईलवर बोलत घरी निघाली होती. जानोरी येथील रेल्वे फाटकाजवळ कानात हेडफोन असल्याने मागून येत असलेल्या रेल्वेचा तिला आवाजच ऐकू आला नाही. यामुळे ट्रेनच्या धडकेत प्रियांकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे रेल्वे फाटक ओलांडताना दोन्ही बाजूने ट्रेन येत आहे की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र कानत हेडफोन लावल्याने आणि फोनवर बोलत असल्याने ट्रेनबाबत तिचा अंदाज चुकला अन अपघात घडला.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
हेडफोन लावून गाडी चालवू नये किंवा रस्त्याने चालताना कानात हेडफोन लावू नये असे वारंवार सांगितलं जातं. यामुळे याआधीही अनेक अपघात झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच असे अपघात होतात. त्यामुळे हेडफोन वापराबाबत काही नियम स्वत:ला घालून घेण्याची सध्या गरज आहे.
Web Title: Accident Headphones took the young woman’s life, the incident caused a stir in the area
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App