धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमावेळी १३ महिला विहीरीत पडल्याने ११ जणींचा मृत्यू
कुशीनगर | Accident: उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तब्बल 13 महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सुमारे 11 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. कु शीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्देवी घटना घडली.
नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम चालू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या. या घटनेत आतापर्यंत ११ महिलां मृत्यूमुखी झाल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटल्याने (Accident) या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक एक करून विहिरीत पडल्या. एकूण 13 महिला या विहिरीत कोसळल्या. तयामध्ये दोन मुलींचाही समावेश होता. विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता. तर पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 11 महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर यामधील दोन महिलांचा जीव वाचला आहे. या 2 महिला गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Accident Eleven people died when 13 women fell into a well during the Haldi program