8 वर्षीय मुलीच्या डोक्यावरुन गेली गाडी; मन हेलावून टाकणारी घटना
Nashik Accident: चारचाकी चाकाखाली येऊन आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या डोक्याहून गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू.
नाशिक: सरकारकडून वेळोवेळी उपाययोजना करुनही रस्ते अपघात कमी होताना दिसत नाही. नाशिकमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीत रस्त्यालगत सोमवार सायंकाळी सहा वाजता झाला इंट्रा (चारचाकी) चाकाखाली येऊन आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या डोक्याहून गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
जोया सलीम शेख (वय ८ ) अपघातात मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शेख दांपत्यास हे एकुलती एक अपत्य असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या घटनेने उपस्थित संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करीत ड्रायव्हरला मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने पिकअपची तोडफोड करत ड्रायव्हरला मारहाण केली. जोयाचे वडील सलीम शेख यांनी ॲम्बुलन्सचा रस्ता अडवल्याने अवधूत वाडी रस्ता अचानक जाम झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पथकासह रवाना घटनास्थळी दाखल झाले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अति शीघ्र दल पथकाला पाचारण केले होते.
Web Title: Accident eight-year-old girl died on the spot after falling under the wheel of a four-wheeler
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App