अहमदनगर | पायी दिंडीत वाहन घुसल्याने अपघात- Accident
Ahmednagar | अहमदनगर: नगर औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात पायी जाणाऱ्या दिंडीला धडक (Accident) दिल्याने पाच महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. धरणगाव जिल्हा जळगाव येथील भगवानबाबा दिंडी पायी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. ही घटना जेऊर शिवारातील जरे वस्तीजवळ घडली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कल्पना विजय कोळी (वय 50), भिकुबाई भगवतीराव पाटील (वय 68, दोघी रा. टाकळखेडा ता. अंमळनेर, जि. जळगाव), निर्मला लक्ष्मण सपकाळ (वय 62 रा. कानोडा ता. जि. जळगाव), रत्नाबाई सुधाकर पाटील (वय 60 रा. चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव), मालताबाई गोकुळ कोळी (वय 47 रा. धरणगाव ता. पाचोरा, जि. जळगाव) अशी जखमी वारकरी महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धरणगाव येथील भगवान बाबा दिंडी पंढरपूरकडे जाण्यासाठी नगरच्या दिशेने येत होती. या दिंडीत पायी चाललेल्या वारकर्यांना गुरुवारी दुपारी जेऊर शिवारातील जरे वस्तीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेने पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत.
Web Title: Accident due to the vehicle entering Dindi