संगमनेर: विद्युतवाहक तार अंगावर पडल्याने गाईचा मृत्यू
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे शुक्रवारी सायंकाळी विद्युत वाहक तार अंगावर पडून एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एकनाथ बाबुराव करंजेकर हे नांदूर खंदरमाळ बावपठार येथे राहत आहे. ते शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय करतात. या शेतकऱ्याची एक गाय त्यांच्या मालकीच्या शेतात चरत असताना अचानक महावितरणची विद्युत वाहक तार तिच्या अंगावर पडल्याने विजेच्या धक्क्याने गायीचा जागीच मृत्यू झाला आहे. दुभत्या गायीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने तुटलेल्या तारा त्वरित जोडाव्यात तसेच घटनेचा पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणी एकनाथ करंजेकर यांनी केली आहे.
Web Title: Accident Cow dies after electric wire falls on it