मोठी बातमी: कंटेनर हॉटेलमध्ये शिरला, १२ जणांचा चिरडून मृत्यू
Mumbai Agra road accident : ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्याने भीषण अपघातात १२ जणांचा चिरडून मृत्यू झाला तर १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे: ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्याने भीषण अपघातात १२ जणांचा चिरडून मृत्यू झाला तर १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. मृत्यू पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.
अधिक माहिती अशी की, हा अपघात धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर घडला आहे. पळासनेर एक भरधाव वेगातील कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. यावेळी हॉटेल मधील १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर हा अपघात झाला आहे. याच गावाजवळ साधारणतः आज दुपारी १२ वाजता एक कंटेनर ब्रेक फेल झाल्याने थेट हॉटेलमध्ये शिरला. घटनास्थळी पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला तर काही जणांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहने उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. अपघातस्थळी पोलिस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Web Title: Accident Container enters the hotel, 12 Crushed to death
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App